Aptoide काय आहे?Aptoide भौगोलिक निर्बंध नसणारे आणि सर्व सामग्री मोफत देणारे एक पर्यायी अँड्रॉइड अॅप स्टोर आहे
Aptoide सुरक्षित आहे का? Aptoide विश्र्वासार्ह आहे का?होय, Aptoide हे पूर्णपणे सुरक्षित अॅप स्टोर आहे. इंस्टलेशन प्रक्रियेदरम्यान, आपणांस कदाचित प्ले प्रोटेक्टकडुन पॉप अप संदेश दिसु शकतो कि, Aptoide ला ब्लॉक करण्यात आले आहे. ह्या संदेशामागचे कारण असे आहे कि, फार जुन्या मॉडेल्स सकट विभिन्न डिव्हायसेससाठी Aptoideची निर्मिती केली गेली आहे! अधिक माहितीवर टॅप करा आणि मग इंस्टॉल एनीवे वर टॅप करा. लक्षात घ्या कि Aptoide इंस्टॉल केल्याने आपल्या डिव्हाईसला कधीही कोणतीही हानी पोचणार नाही.
Aptoide कसे डाऊनलोड आणि इंस्टॉल करावे?Aptoide इंस्टॉल करण्यासाठी आपणांस आपल्या अँड्रॉइड डिव्हाईसमधुन फक्त आमच्या वेबसाईट वर जाऊन मुख्य पृष्ठाच्या वरच्या भागातील डाऊनलोड बटनावर टॅप करायचे आहे. कदाचित आपल्या अँड्रॉइड सेटिंग्जमध्ये आपणांस अनामिक स्त्रोतांकडील अॅप इंस्टॉलेशन सक्रिय करावे लागेल, जे आपणांस गुगल प्ले स्टोरच्या बाहेरील अॅप्स आपल्या अँड्रॉइड डिव्हाईसवर इंस्टॉल करु देईल.
Aptoide टीव्ही काय आहे?Aptoide टीव्ही हा एक अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही आणि सेट टॉप बॉक्सेसचा पर्याय आहे. Aptoide टीव्हीमध्ये अँड्रॉइड टीव्हीसाठी २५००हून अधिक अॅप इष्टतम केलेले आहेत आणि हे वापरण्यास पूर्णपणे मोफत आहे.
Aptoide टीव्ही कसा इंस्टॉल करावा आणि वापरावा?Aptoide टीव्हीचे इंस्टलेशन आपल्या अँड्रॉइड टीव्ही किंवा सेट टॉप बॉक्सवर करण्यासाठी tv.aptoide.com वर जा आणि डाऊनलोड Aptoide टीव्ही वर टॅप केल्यानंतरच्या सूचनांचे पालन करा.
Aptoide बॅलन्स काय आहे?Aptoide बॅलन्स हे अॅपमधील व्यवहाराचे डिजीटल चलन आहे. लॉयल्टी प्रोग्रॅमप्रमाणे ह्याचा वापर करुन आपण आपल्या आवडत्या खेळात खरेदीच करु शकता. चांगली बाब? सर्व खरेदीवर आपणांस २०%पर्यंत बोनसही मिळतो!